सिल्लोड, (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीं आरक्षणामधील मधील संभाव्य उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) रद्द करण्यासाठी १३ जुलै सोमवार रोजी सिल्लोड येथे अनु. जाती उपवर्गीकरण विरोधी भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
संविधान, सामाजिक न्याय, समता आणि अनुसूचित जातींच्या विद्यमान आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. पत्रकार परिषदे यावेळी ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाने बहुमताने दिलेल्या निर्णयात, राज्य सरकारांना विशिष्ट परिस्थितीत अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची मुभा असू शकते, असे नमूद केले.
परंतु अनुसूचित जाती मधील एकजूट तोडण्यासाठीच न मागता उपवरगीकरण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे मात्र, असे उपवर्गीकरण करताना राज्याने ठोस, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित आकडेवारी सादर करणे आवश्यक आहे. उपवर्गीकरण मनमानी पद्धतीने किंवा कोणत्याही समाजघटकावर अन्याय होईल
अशा प्रकारे करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आणि सरकारच्या या कुटील डावाला विरोध करण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात उप वर्गीकरण विरोधात मोर्चे काढण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सिल्लोडमध्ये १३ जुलैला जन आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.
महामोर्चा आयोजकांच्या मते, जर अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्यात आले, त्याचे पुढील दुष्परिणाम होऊ शकतात, यापूर्वी पंजाब आणि आंध्र प्रदेश मध्ये असे प्रयोग झाल्याने तेथील सर्व जनताच आता उप वर्गीकरणाला करायला विरोध करत आहे. कारण अनुसूचित जातीच्या न भरल्या जागा खुल्या प्रवर्गात नंतर वर्ग करण्यात आल्या. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीकरणावर स्थगिती आणली आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.
अनुसूचित जातींमध्ये सामाजिक फूट आणि परस्पर मतभेद वाढण्याची शक्यता. संविधानाने दिलेल्या समान प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत प्राचार्य सुनिल वाकेकर, श्रावण गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, के. आर. डुबे, डॉ. प्रकाश बिरारे, के, के जगताप, प्रभाकर पारधे, अमित आरके, नगरसेवक जितु आरके, विनोद पगारे, अशोक सोनवणे, वाय. आर. साळवे, अशोक सुरडकर, प्रा. विजय वाकेकर, अरुण कोतकर, बारकू आरके, राजेश्वर आरके, राजु जमधडे, मनोहर आरके, धम्मा दांडगे, अशोक आरके, प्रभाकर सुरडकर, अभय वाकेकर, प्रल्हाद पगारे, रोहन शेजुळ, शेख सोहिल, नाना सुरडकर, देविदास सुरडकर, धम्मा दांडगे यांची उपस्थिती होती.














